आळंदी देवाची येथील श्री. ह. भ. प. गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटी माऊली) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत आहे.
ता. २३ ते ३० रोजी प्रतिदिन ह. भ. प. गोसेवक माऊली महाराज (भालचंद्र डोंगर), ज्ञानेश्वर माऊली कुराडे ( आळंदी देवाची),
पोपट महाराज पाटील (कासारखेड ),एकनाथ महाराज सदगीर( ठाणे), महेश महाराज (माकणीकर), ता. २८ रोजी सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वर माऊली कदम( आळंदी देवाची), रात्री महादेव महाराज राऊत (बीड) , गौरव महाराज उफाडे (पुणे) व ता. ३० रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे सकाळी नऊ ते ११ या वेळात काल्याचे किर्तन होणार आहे.
तसेच दररोज दुपारी दोन ते चार या वेळात श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर ज्ञानेश्वर माऊली कदम कथा सांगणार आहेत.
कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा, वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा प्रतिष्ठान गोराणे, श्री क्षेत्र भीमाशंकर, गुरुवर्य ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) येथील वारकरी संप्रदायातील बंधू यांची बैठक झाली असून गोराणे, कोटबेल, आखतवाडे, बिजोटे, पारनेर, निताने, पिंगळवाडे, भुयाने, जायखेडा, सोमपूर, द्याने, दसवेल व डोंगरगाव (ता. देवळा) आदी गावातून ( ता. २७) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत जास्तीत जास्त मांडे प्रसाद रुपी तयार करून वाहनांद्वारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा ठिकाण संत कवी महिपती महाराज वारकरी भुवन चाकण रोड आळंदी देवाची येथे पोहोच करण्यात येणार आहेत.
ज्या भाविक भगिनींना मांडे प्रसाद भोजन द्यावयाचे असेल त्यांनी
ह भ प कृष्णा भामरे (पिंगळवाडे)-
मो.९४२३४८१२०८,
हभप कडू खैरनार ,(कोडबेल)-
मो.९४२१६२४१६३,
गायनाचार्य दीपक देसले (गोराणे)मो.९६२३९३२०३६,
नवलभाऊ देसले (गोराणे)
मो.९३५६५२५०४४
यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो १) श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ,
